पुणे : माजी आमदार आणि प्रसिध्द उद्योजक विनायक निम्हण यांच्या वाढदिवसा निमित्ताने सोमेश्वर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित भक्तीरंग भजप स्पर्धेत महिला विभागात सुतारवाडीच्या जोगेश्वरी महिला भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकविला तर पुरूष गटात नांदेड सिटी येथील ज्ञानाई भजनी मंडळ प्रथम आले. माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या संकल्पनेतून ही अभिनव अशी ऑनलाईन भजन स्पर्धा घेण्यात आली होती मात्र, त्याची अंतिम फेरी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली.
या स्पर्धेत शहारातील जवळपास महीला 50 संघ आणि पुरुष 8 संघ अशा संघांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता. बऱ्याच दिवसांनी टाळ, मृदंग, अभंगाच्या निनादात समस्त निम्हण विठ्ठल मंदिर पाषाण परिसर भक्तीरंगात न्हाऊन गेला होता. माजी नगरसेवक सनी निम्हण, नितीन निम्हण, संजय निम्हण, बाळासाहेब बामगुडे, वारकरी क्षेत्रातील मान्यवर हभप शांताराम निम्हण, हभप पांडूरंग दातार, हभप मारूती कोकाटे, हभप कृष्णा भोते, डॉ. नितीन कोकाटे, गोविंद रणपिसे, हभप अंकुश दगडे हभप जाधव, आणि या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले हभप हरिदास गुजर, हभप उद्धव गोरे उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन निम्हण यांनी केले.
असे आहेत भजन स्पर्धेचे विजेते
महिला विभागात प्रथम क्रमांक जोगेश्वरी महिला भजनी मंडळ सुतारवाडी, द्वितीय क्रमांक स्वरांजली महिला भजनी मंडळ, ताथवडे. तृतीय क्रमांक कृष्णाई महिला भजनी मंडळ, बावधन खुर्द तर उत्तेजनार्थ हरिओम महिला भजनी मंडळ, सेनापती बापट रोड. कृष्णाई महिला भजनी मंडळ, चिंचवड. विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ, बावधन. जय माला महिला भजनी मंडळ, जुनी सांगवी. तर उत्कृष्ट हार्मोनियम वादक (जय मला भजनी मंडळ ) उत्कृष्ट पखवाज वादक ( स्वरांजली महिला भजनी मंडळ ), तर उत्कृष्ट तबला वादक बक्षिस कृष्णाई भजनी मंडळास देण्यात आले.
तर पुरूष गटात प्रथम क्रमांक ज्ञानाई भजनी मंडळ ,नांदेड सिटी. द्वितीय क्रमांक जय गणेश भजनी मंडळ, हडपसर. तृतीय क्रमांक औंध गाव भजनी मंडळ, तर उत्तेजनार्थ बक्षिसे सोमेश्वर वाडी भजनी मंडळ आणि सुतारवाडी भजनी मंडळास देण्यात आले.