औद्योगिक वसाहतीतील लॉजवर छापा : दोघांना पोलीस कोठडी
बारामती- शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील जी. एस हॉटेल अँड लॉजिंगमध्ये बेकायदा वेश्या व्यवसायप्रकरणी बारामतीच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी (दि. 2) रात्री पावणेदहाच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात लॉज व्यवस्थापकासह दोघांना अटक केली. या दोघांना बारामती न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना मंगळवार (दि. 6) पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली. दरम्यान, बारामातीत खुलेआम वेश्य व्यवसाय सुरू असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
हॉटेल व्यवस्थापक निखील ज्ञानदेव कनिचे (रा. सूर्यनगरी, बारामती, मूुळ रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर), केतन विलास मोरे (रा. शेळगाव, ता. इंदापूर) असे कोठडी सुनवण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर पोलीस हवालदार भानुदास बंडगर यांनी फिर्याद दिली आहे.
बारामती औद्योगिक वसाहत परीसरातील बॅंक ऑफ महाराष्ट्र शेजारी असलेल्या जी. एस हॉटेल अँड लॉजिंगमध्ये बेकायदा वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी पावणेदहाच्या सुमारास बनावट ग्राहक पाठविले. त्यानंतर टाकलेल्या छाप्यातकाही महिलांकडून दोघे आरोपी वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले.
यावेळी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात बनावट ग्राहकाने दिलेली 2 हजार रूपयांची नोट, कंडोमची 40 पाकिटे, पाच हजार रूपये किंमतीचा मोबाइल असा एकूण 7 हजार 40 रूपयांचा माल पोलिसांनी जप्त केल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदिप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती गुन्हे शोध पथकाचे संदिप जाधव, सुरेंद्र जाधव, स्वप्निल अहिवळे, दशरथ कोळेकर, विशाल जावळे, शर्मा पवार तसेच बारामती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलिस उपनिरीक्षक सचिन पत्रे, हनुमंत बंडगर यांनी केली.