कोल्हापूर – जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी गावातील डोंगराला भेगा पडल्या आहेत. भेगा पडल्याने डोंगराचा भाग खचण्यास सुरुवात झाली आहे.
बादेवाडी हे गाव पन्हाळा तालुक्यातील दुर्गम भाग असून मसाई पठार परिसरातील खालच्या बाजूस असून या परिसरात असणाऱ्या डोंगराला भेगा पडल्या आहेत. प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकरी घटनास्थळी रवाना झाले आहेत.