पौड (पुणे) – मुळशी तालुक्यातील पौड येथील मुळा नदीच्या काठावर गौरी गणपतीचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले.
विसर्जनच्यावेळी कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पौड पोलीस स्टेशनने मोठ्या बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, उपनिरीक्षक अनिल लवटे, उपनिरीक्षक रेखा दुधभाते, पोलीस संदीप सकपाळ यांनी पौड नदी ठिकाणी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती, तसेच घरगुती गौरी गणपती व मंडळाचे गणपती यांना कमी लोकांमध्ये गणपती घेऊन विसर्जन करण्यास सांगितले आहे. दुपारनंतर नागरिक गणपती आणि गौरी विसर्जन करण्यासाठी येत होते. यावर्षी साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले.
दरवर्षी मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढून विसर्जन करीत असे; पण या वर्षी करोना महामारीमुळे नागरिकांना व सार्वजनिक गणेश मंडळांना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्यात आला.