सोरतापवाडी- हवेली तालुक्यातील पेठ ग्रामपंचायतीच्या हद्दीत अल्ट्रा टेक कंपनी व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ओढा खोलीकरण व रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी कंपनीने मोफत पोकलेन मशीन उपलब्ध करून दिले आहे. रेल्वे पूल ते पेठ गावापर्यंत ओढ्याचे काम होणार आहे. पावसामुळे ओढ्यात पाणी साचणार आहे. ओढ्यातील पाण्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब जमिनीत मुरविणे गरजेचे आहे. त्यामुळे भूजल पातळीत वाढ होणार आहे. खोलीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर यावर्षी होणाऱ्या पावसाळ्यामुळे जास्तीत जास्त पाणी ओढ्यामध्ये मुरणार आहे. त्यामुळे पेठ गावातील जलस्रोत बळकट होण्यास मोलाची मदत होणार आहे.
ओढ्याने मोकळा श्वास घेतला आहे. ओढा खोलीकरणामुळे गावातील व परिसरातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यावेळी सरपंच कमल शेलार, उपसरपंच सचिन हाके, रघुनाथ चौधरी, युवराज चौधरी, राजेंद्र आढाव,अर्जुन चौधरी, सुजीत चौधरी, निलेश चौधरी, अतुल चौधरी, सतीश चौधरी, अमोल चौधरी, अक्षय चौधरी आदी उपस्थित होते.