नीरा – आषाढी एकादशीनंतर सोमवारी (दि. 22) संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. परतीच्या प्रवासातही माऊलींच्या पादुकांना “माऊली माऊलींच्या’ जयघोषात नीरा नदीच्या प्रसिद्ध दत्ता घाटावर स्नान घातले गेले. सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथील कालचा मुक्काम होता. सोमवारी सकाळी पालखी सोहळा नीरानदी किनारी आला. त्यानंतर माऊलींच्या पादुकांना दत्ता घाटावर स्नान घातले.