केडगाव- करोनाने आज पुन्हा दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागात डोके वर काढले आहे. प्राप्त झालेल्या अहवालानुसार 28 जणांना करोनाची बाधा झाली आहे. यवत ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर म्हणाल, काल एकूण 79 जणांची करोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी आज यवत गावात पाच, केडगाव नऊ, भांडगाव दोन, बोरिपार्धी दोन, चौफुला तीन, राहू तीन, नाथाचीवाडी एक, पाटस तीन, अशा 28 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्वजण 6 ते 60 वर्षांपर्यंतचे असून त्यामध्ये 22 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे.