नवी दिल्ली – राजधानी दिल्ली शहराच्या अंतर्गत एकूण 1260 किमी लांबीचे रस्ते असून हे रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने एक मोहींम हाती घेण्यात आली आहे. दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने हाती घेण्यात आलेली आजवरची ही सर्वात मोठी मोहीम असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
ते म्हणाले की आम आदमी पक्षाचे 50 आमदार आपल्या मतदार संघातील प्रत्येकी 25 किमी लांबीच्या रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेत असून त्यांच्या बरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रत्येकी एक अभियंता दिला जाणार आहे. हे काम रस्त्यांच्या ऑडिट प्रमाणे केले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
अलिकडेच आलेल्या पावसामुळे दिल्लीच्या रस्त्यांचे मोठे नुकसान झाल्याने युद्ध पातळीवर ही रस्ते दुरूस्ती मोहीम केजरीवाल सरकारने हाती घेतली आहे.