वडगाव मावळ– मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना करोनाची लागण झाली आहे. बुधवार (दि. 2) त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सप्टेंबर 2019 मध्ये बर्गे यांनी मावळच्या तहसीलदारपदाचा पदभार स्वीकारला. करोनाकाळात तहसीलदार बर्गे यांनी प्रत्यक्ष फिल्डवर्क देखील मोठ्या प्रमाणात केले आहे. मावळ तालुक्यात करोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी ते सतत कार्यरत होते. तालुक्यातील करोनाची परिस्थिती अत्यंत उत्तम रितीने हाताळली आहे. ग्रामीण भागात जाऊन चांगले काम त्यांनी केले. कोविड केअर सेंटर उभारणी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांना करोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी करोनाची चाचणी केली. चाचणी अहवालात त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व आमदार सुनील शेळके यांनी गेल्या आठवड्यात लोणावळा ते देहूरोड असा तालुक्याचा दौरा केला होता. या दौऱ्यात जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ अधिकारीही सहभागी होते. त्यामुळे बर्गे यांच्या संपर्कात आलेल्या या अधिकारी व पदाधिकारी यांचीही कोरोना चाचणी केली जाण्याची शक्यता आहे.