- विषय समिती सभापती निवडणूक
तळेगाव दाभाडे – येथील नगरपरिषदेच्या विषय समित्यांची निवडणूक बुधवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता पिठासिन अधिकारी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड व उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
विषय समित्यांची मुदत गुरुवारी (दि. 30) संपणार असल्याने पीठासीन अधिकारी तथा मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता आयोजित विशेष सभेत विषय समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यात आली. दुपारी 2 वाजता विषय समितीच्या सभापतींची निवड करण्यात आली. या सभेला नगराध्यक्षा जगनाडे, यांच्यासह निवडून आलेले 26 व 3 स्वीकृत सदस्य उपस्थित होते. सभापतींची निवड बिनविरोध झाली. जनसेवा विकास समितीच्या वाट्याला 3 सभापती, तर भाजपच्या वाट्याला तीन सभापती पदे आली असून, स्थायी समितीवर भाजपचे एक सदस्य व तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे दोन सदस्य आले.
विषय समिती त्यांचे सभापती, सदस्य पुढीलप्रमाणे :
सार्वजनिक बांधकाम समिती सभापती : मंगल जाधव – सदस्य : नीता अशोक काळोखे, कल्पना सुरेश भोपळे, रोहित महादू लांघे, अनिता अनिल पवार, संतोष मारुती भेगडे, वैशाली प्रमोद दाभाडे.
शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती : गणेश वसंत खांडगे – सदस्य : निखील उल्हास भगत, सुशील ज्ञानेश्वर सैंदाणे, संतोष आनंदा शिंदे, सुरेश यशवंत दाभाडे, संगीता राजेंद्र शेळके, मंगल नंदकुमार भेगडे.
स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती : सुलोचना गंगाराम आवारे – सदस्य : रवींद्र गंगाराम आवारे, सुरेश यशवंत दाभाडे, संतोष आनंदा शिंदे, अमोल जगन्नाथ शेटे, अरुण बबन माने, संतोष मारुती भेगडे.
पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती सभापती : संग्राम बाळासाहेब काकडे – सदस्य : रवींद्र गंगाराम आवारे, संध्या गणेश भेगडे, प्राची दत्तात्रय दळवी, विभावरी रवींद्र दाभाडे, वैशाली प्रमोद दाभाडे, किशोर छबुराव भेगडे.
नियोजन व विकास समिती सभापती : शोभा अरुण भेगडे – सदस्य : नीता अशोक काळोखे, अमोल जगन्नाथ शेटे, हेमलता चंद्रभान खळदे, निखील उल्हास भगत, बापूसाहेब जयवंत भेगडे, अरुण बबन माने.
महिला व बालकल्याण समिती सभापती : काजल प्रदीप गटे व उपसभापती कल्पना सुरेश भोपळे – सदस्य : संध्या गणेश भेगडे, हेमलता चंद्रभान खळदे, अनिता अनिल पवार, मंगल नंदकुमार भेगडे, संगीता राजेंद्र शेळके.
स्थायी समितीच्या पदसिध्द अध्यक्षा : नगराध्यक्षा चित्रा संदीप जगनाडे – सदस्य : मंगल जाधव, गणेश खांडगे, सुलोचना आवारे, संग्राम काकडे, शोभा भेगडे, काजल गटे, अरुण भेगडे, किशोर भेगडे, गणेश काकडे आदींची निवड झाली.
निवडीबद्दल सभापती व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक उद्योजक किशोर आवारे आदी मान्यवर उपस्थित होते. तळेगाव दाभाडे शहराच्या विकासासाठी विधायक कामे करण्याचा मनोदय व्यक्त केला. या वेळी ज्येष्ठ नगरसेवक सुशील सैंदाणे यांनी आभार मानले.