पाॅटचेफस्ट्रूम (द.आफ्रिका) : एम्मानुअल बावाच्या नाबाद शतकी, तौराई तुगवेटे आणि गैरेथ चिरावु याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेने मंगळवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील (Plate Quarter final 3) सामन्यात कॅनाडाचा ९५ धावांनी पराभव करत विजय नोंदविला. एम्मानुअल बावा सामन्याचा मानकरी ठरला.
#U19CWC – RESULT: @Zimcricketv U19 271-7 in 50 ov (Bawa 105*,Chirawu 54*,Tugwete 50; Kumar 3/63, Shamsudeen 1/36) beat @canadiancricket U19 176 in 47.3 ov (Bedi 26*,Kumar 24; Ndlela 2/34,Nkosilathi 2/35,Chirawu 2/40) by 95 runs.
A job well done!👏#ZIMvCAN | #FutureStars |🇿🇼🇨🇦 pic.twitter.com/TYfBDdXKqh
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) January 28, 2020
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर झिम्बाब्वेने तौराई तुगवेटेच्या ५०, ताडीवानाशे मरूमानीच्या २८, एम्मानुअल बावाच्या नाबाद १०५ आणि गैरेथ चिरावुच्या नाबाद ५४ धावांच्या खेळीच्या जोरावर ५० षटकांत ७ बाद २७१ अशी मजल मारली होती. कॅनाडाकडून अखिल कुमारने ३ गडी बाद केले.
#U19CWC | INNINGS BREAK: @ZimCricketv U19 271-7 in 50 overs
(Emmanuel Bawa 105*, Gareth Chirawu 54*, Taurayi Tugwete 50; Akhil Kumar 3/63, Raqib Shamsudeen 1/36, Harmanjeet Bedi 1/41) Bawa you beauty!🙇♂#ZIMvCAN | #FutureStars | 🇿🇼🇨🇦 pic.twitter.com/SXX2AkHcJA
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) January 28, 2020
त्यानंतर २७२ धावांचा पाठलाग करण्यास मैदानात उतरलेला कॅनाडाचा संघ ४७.३ षटकांत १७६ धावसंख्येवरच आटोपला. कॅनाडाकडून फलंदाजीत रूषी जोशीने २६, हरमनजीत बेदीने नाबाद २६, अखिल कुमारने २४, अष्टन देवसैमीने २२ आणि बेंजामिन कालित्जने १९ धावांची खेळी केली. झिम्बाब्वेकडून गोलंदाजी करताना कोसिलाटू नुनू, गैरेथ चिरावु आणि सखुमुजी एंडलेला याने प्रत्येकी २ गडी बाद केले.