तळेगाव ढमढेरे (पुणे) -करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गावात पॉझिटिव्हची रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आजच्या दिवसात 11 रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने सांगितली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील चिमणापिरमळा 7, विशालविश्व सोसायटी 1, भीमाशेत 1, आरंभ सोसायटी 2 अशा11 जणांना करोनाची लागण झाली आहे.
तळेगावच्या परिसरात रोजच्या रूग्ण संख्येत वाढ झाली असून आज दिवसभरात करोना बाधित 11 संख्या रुग्णांची भर पडली आहे. आजच्या कोरोना बाधितांच्या उच्चांकी वाढीव संख्येने गाव हादरून गेले आहे. या वाढत चालली असल्याने संख्येने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या घटनेनंतर गावात ठिकठिकाणी आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने निर्जंतुकीकरण करण्यात आले.
आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाय योजले असून, नागरिकांनी कोरोना रोखण्यासाठी लॉक डाऊनचे नियम पाळून शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी विनाकारण फिरू नये, तोंडाला मास्क लावावा, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्स पाळावा, गर्दी टाळावी असे आवाहन प्रशासनाने ग्रामस्थांना केले आहे.