लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन बुधवारी युरोपियन युनियनला दिलेला “ब्रेक्सिट’साठीचा अंतिम प्रस्ताव उघड करणार आहेत.
जर ब्रुसेल्सने त्याची दखल घेतली नाही तर ब्रिटन बोलणे थांबवेल आणि 31 ऑक्टोबरला कशाचीही पर्वा न करता युरोपिय संघातून बाहेर पडेल, असेही जॉन्सन यांनी म्हटले आहे. हुजूर पक्षाच्या वार्षिक परिषदेच्या शेवटच्या भाषणात जॉन्सन ब्रेक्झिटवरील त्यांच्या कठोर भूमिकेवर कायम राहिले. ते आपल्या “निष्पक्ष आणि वाजवी’ तडजोडींबद्दल पार्टीला विश्वासाने तपशील देताना बोलत होते.
ब्रिटनने युरोपिय संघ सोडण्यास महिनाभरापेक्षा कमी वेळ शिल्लक असताना “ब्रेक्झिट’ म्हणजे, द्वितीय विश्वयुद्धानंतरची सर्वात महत्त्वाचे भौगोलिक-राजकीय पाऊल अनिश्चित बनले आहे. या करारासह किंवा कोणत्याही कराराशिवाय बाहेर पडणे किंवा युरोपिय संघातून बाहेरच न भूमिका जॉन्सन यांनी स्वीकारली आहे.
“माझ्या मित्रांनो, मला भीती वाटते की साडेतीन वर्षांनंतर लोकांना असे वाटते की त्यांना मूर्ख बनवले गेले आहे. त्यांना संशय येऊ लागला आहे की या देशातील दबाव गट आहेत जे ब्रेक्झिट मुळीच करू इच्छित नाहीत, असे जॉन्सन यांनी या प्रस्तावामध्ये म्हटले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोणत्याही परिस्थितीत 31 ऑक्टोबरला “ब्रेक्झिट’बाबत निर्णय घेतला जाईल, असे जॉन्सन यांनी निश्चितपणे ठरवले आहे. युरोपिय संघाकडून पुरेशा सवलती पदरात पाडून घेऊन युरोपिय संघातून बाहेर पडण्यासाठी जॉन्सन यांनी अंतिम प्रस्तावाचा मसुदा तयार केला आहे. त्या प्रस्तावाला ब्रिटनच्या संसदेची मंजूरी मिळवण्यासाठी तो संसदेमध्ये मांडला जाईल.