पॅरिस : फ्रान्सच्या आरोग्यमंत्र्यांनी युरोपमधील कोरोनाचा पहिला बळी पडला असल्याचे मान्य केले. या रुग्णावर 25 जानेवारीपासून उपचार सुरू होते. हा रुग्ण 80 वर्षाचा होता, असे फ्रान्सचे आरोग्यमंत्री अग्नेस बुझीन यांनी सांगितले.
हा रुग्ण हुबेई प्रांतातून आलेला असून तो प्रान्समध्ये 16 जानेवारीला आला. त्याच्या फुफ्फुसाच्या संसर्गाने दाखल करण्यात आले. त्यांना कोविड 19ची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र त्याची प्रकृती सातत्याने ढासळत गेली. त्यांच्या मुलीलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र ती या संसर्गापासून बरी होण्याची शक्यता आहे.
चीनमध्ये या विषाणूंची साथ आल्यापासून युरोपात 46 जणांना बाधा झाली आहे. नऊ युरोपीयन राष्ट्रांमध्ये बाधीत आढळले आहेत. जर्मनित सर्वाधिक म्हणजे 16 बाधीत आहेत. या विषाणूंची जगभरात 67 हजार जणांना बाधा झाली असून मात्र एक हजार एक हजार 526 जण मरण पावले आहेत. चीनमध्ये सहा कोटी लोकांना कोंडून ठेवण्यात आले आहे. अनेक आपत्कालीन रूग्णालये उभारण्यात आली असून या विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.