पुणे : कॉंग्रेस पक्षाने सर्वसामान्य जनतेवर सदैव विकासाचे आणि आधाराचे छत्र धरले आहे. कॉंग्रेसचे युवानेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त 10 हजार छत्र्यांचे वाटप करण्यात येणार असून त्यामध्ये तीच भावना आहे. समाजातील उपेक्षित,गोरगरिबांच्या विकासासाठी प्रत्येक संकट काळी कॉंग्रेस पक्ष मदतीला धावून येत असतो. असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी केले.
बागुल यांच्या प्रभागातील 10 हजार नागरिकांना मोफत छत्र्या वाटपाचा कार्यक्रम आज प्रातिनिधिक स्वरूपात संपन्न झाला यावेळी पुणे शहर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बागुल म्हणाले की, कॉंग्रेस आपल्या दारी या माध्यमातून कॉंग्रेसचे छत्र असलेली छत्री वाटप करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून कॉंग्रेस व गांधी परिवाराची सदैव जनतेला मदत करण्याची भूमिका असून त्याच भूमिकेतून पक्षाच्या माध्यमातून हजार छत्र्या वाटपाचा संकल्प केला असून प्रभागातील नागरिकांना घरोघरी छत्री वाटप करण्यात येणार आहे. या काळात नागरिकांना त्याचा नक्कीच फायदा होईल.
यावेळी सूर्योदय सोशिअल फाउंडेशन मधील वंचित घटकातील मुलांचा हस्ते केक कापण्यात आला तसेच या संस्थेला रोख स्वरूपात आर्थिक साहाय्य करण्यात आले.यावेळी सेवादलचे अध्यक्ष दीपक पवार, वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य द स पोळेकर,ब्लॉक अध्यक्ष सतीश पवार व रमेश सोनकांबळे, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या सरचिटणीस इंदिरा आहिरे, ताई कसबे, नंदा ढावरे, विश्वास दिघे,अकबर मणियार, विक्रम खन्ना, राजू शेख, प्रकाश आरने, संतोष गेळे, इमाम हन्नूर, केतन जाधव, दीपक ओव्हाळ, आनंद बाफना, नंदकुमार बानगुडे, सागर आरोळे, धनंजय कांबळे, सुरेश गायकवाड, अशोक शिंदे, इम्तियाज तांबोळी, संतोष पवार, ओंकार उपाध्ये, महेश ढवळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.