मंचर – कळंब (ता. आंबेगाव) येथील कमलजादेवी प्री-प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल आणि जिल्हा परिषद शाळेला नंदकुमार चिंचकर यांनी साडेसात हजार रुपये किमतीचा प्रिंटर प्रदान केला, अशी माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गंगाराम भालेराव यांनी दिली. शाळेला प्रिंटर देण्यासाठी नंदकुमार चिंचकर यांना शाळा व्यवस्थापन समिती सदस्य निलेश कानडे यांनी प्रोत्साहित केले. यावेळी उपसरपंच डॉ. सचिन भालेराव, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष सचिन चिखले, मुख्याध्यापिका सुनंदा भालेराव, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष गोकुळ भालेराव, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य इसाक शेख, शिक्षिका मीना निऱ्हाळी, गीतांजली शेलार, शितल रामकर, स्वाती भालेराव,सनाह शेख, आदर्श शिक्षक संतोष कानडे, गणेश लोहकरे यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नंदकुमार चिंचकर यांचा सत्कार उपसरपंच डॉ. सचिन भालेराव यांच्या हस्ते करण्यात आला.