दिल्लीतील मदरशात हनुमान चालिसा शिकवणे गरजेचे

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आम आदमी पक्षा’ला सत्ता मिळाल्यानंतर भाजप नेते कैलास वैजयवर्गीय यांनी मुख्यामंत्री अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले. मात्र दिल्लीतील मदरसा आणि शाळांमध्ये आता हनुमान चालीसा शिकवा असा सल्ला त्यांनी केजरीवाल यांना दिला आहे.

दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर हनुमान चालिसा म्हणून दाखवली होती. आणि  दिल्ली विधासभेचा निकाल आल्यानंतर केजरीवाल यांनी हनुमानाचे दर्शन घेतले होते. त्यामुळे विजय वर्गीय यांनी हाच मुद्दा लक्षात धरत अरविंद केजरीवाल यांना हा सल्ला दिला. हनुमानाच्या चरणी नतमस्तक होणाऱ्यांना हनुमान आशीर्वाद देतात, हे सिद्ध झाले आहे. दिल्लीतील मदरसे, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हनुमान चालिसा शिकवणे गरजेचे आहे. दिल्लीकरांना हनुमानाच्या कृपेपासून वंचित ठेवणार का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.