पुणे : करोना संकटाच्या अहोरात्र आपले कर्तव्य बजावर महाराष्ट्रातील लाखो नागरिकांचे प्राण वाचविण्याऱ्या राज्यभरातील डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक राखी डॉक्टरांसाठी या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमा अंतर्गत आता पर्यंत राज्यातील 12 हजार डॉक़्टर तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पाठविण्यात येणार आहेत. शहरातील महिला भगिनींच्या नावाने या राख्या आणि शुभेच्छा पाठविण्यात येणार असून त्यासाठी जास्तीत जास्त महिलांना सहभाग घ्यावा असे आवाहन या उपक्रमाचे संयोजक माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी केले आहे.
याबाबत माहीती देताना निम्हण म्हणाले की, या उपक्रमा अंतर्गत राखी सोबतच महिलांच्या नावाने त्यांच्या शुभेच्छा असलेले पत्र तसेच राख्या पाठविण्यात येणार आहेत, राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रना पाठविण्यात येणार आहेत. गेल्या दोन दिड वर्षांपासून हे वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत.त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम आहे. त्या अंतर्गत ज्या महिलांनी पाठविलेले संदेश तसेच राखी डॉक्टरांना पाठविली जाईल. त्यामुळे या आगळया वेगळया उपक्रमाद्वारे सर्वांचेच मनोबल वाढण्यास मदत होईल. त्यामुळे, शहरातील महिला भगिनींनी 8308123555 या क्रमांकावर नोंदणी करावी असे आवाहन निम्हण यांनी केले आहे.