मोरादाबाद- उत्तर प्रदेश पोलिसांनी मोरदबादच्या भागामध्ये अवैधरित्या चालवले जाणारे 60 दारुचे धंदे उद्ध्वस्त केले आहेत. काही नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रादेशिक सशस्त्र दल आणि पोलिसांच्या संयुक्त छाप्यांमध्ये हे धंदे उद्ध्वस्त करण्यात आले, अशी माहिती पोलिस उपाधिक्षक राजेश कुमार यांनी दिली. या कारवाई दरम्यान तब्बल 3 हजार लिटरचे मद्य नष्ट करण्यात आले.
या भागामध्ये अवैध दारुधंदे पुन्हा सुरु होणार नाहीत, यासाठी पोलिस सतर्क राहणार आहेत. आवश्यकता भासल्यास पुन्हा छापे घालून कारवाई केली जाईल असेही पोलिसांनी म्हटले आहे. या संदर्भात खबऱ्यांचे नेटवर्क उभे करण्यात आले आहे. अवैध दारुधंद्यांमुळे उत्तर प्रदेशात बाराबंकी येथे अलिकडेच 10 जण मरण पावले होते. त्या पार्श्वभुमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.