मुंबई – वरिष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंह यांनी ट्विट करीत निर्भयाच्या आईला या प्रकरणातील आरोपींना माफ करण्याचे आवाहन केले होते. यासाठी त्यांनी राजीव गांधी हत्याप्रकरणात सोनिया गांधी यांचे उदाहरण दिले होते. सध्या इंदिरा जयसिंह यांनी गेलेल्या विधानावर सर्व स्थरातून प्रतिक्रिया येत आहे.
#WATCH Kangana Ranaut on senior lawyer Indira Jaising’s statement,’Nirbhaya’s mother should forgive the convicts’: That lady (Jaising) should be kept in jail with those convicts for four days…Women like them give birth to these kind of monsters and murderers. (22.1) pic.twitter.com/MtNcAca1QG
— ANI (@ANI) January 23, 2020
याच मुद्यावरून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हीने संताप व्यक्त करताना वादग्रस्त विधान केले आहे. ‘अशा महिलांच्या पोटीच बलात्कारी जन्म घेतात” अशा शब्दांत कंगनाने जयसिंह यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मुंबईत बुधवारी ‘पंगा’ या सिनेमाच्या प्रिमियरदरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत कंगना बोलत होती.
दरम्यान, इंदिराज जयसिंह यांच्यावर राग व्यक्त करताना कंगना म्हणाली, “या महिलेला चार दिवस निर्भया प्रकणातील आरोपींसोबत तुरुंगात ठेवायला हवे. या कशा महिला आहेत ज्यांना बलात्कारातील आरोपींवर दया येते. अशा महिलांच्या पोटीच असे नराधम जम्म घेतात ज्यांना बलात्कारी आणि खून्यांप्रती प्रेम असते. असं म्हणत कंगनाने इंदिराज जयसिंह यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.