पुणे – सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारताकरीता तरुणाईने पुढाकार घ्यावा तसेच युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्यासाठी पुण्यामध्ये पाचव्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे.
नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल ऍन्ड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे दि.29 व 30 जानेवारी रोजी संस्थेच्या सभागृहात सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत ही संसद होणार आहे. यामध्ये देशभरातील राजकारण, समाजकारण आणि विविध विषयांतील तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी तरुणांना मिळणार आहे, अशी माहिती संसदेचे संस्थापक अध्यक्ष ऍड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.