‘आठवणीतील अटलजी’ कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त लोकमान्य टिळक विचार मंचाच्या वतीने “आठवणीतील अटलजी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी ( दि. 18 ऑगस्ट) रोजी सायंकाळी 6 वाजता बालगंधर्व रंगमदीरात हा कार्यक्रम होणार असल्याची माहीती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली. या कार्यक्रमात अटलजींच्या राजकीय, सामाजिक, जीवनातील विविध पैलू उलगडून दाखविणारा आठवणीतील अटलजी हा कार्यक्रम होत आहे.
स्वर्गीय अटलजीं समवेत राजकरणात असलेले उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, खासदार गिरीश बापट सहभागी होणार असून सुधीर गाडगीळ मुलाखत घेणार आहेत. अटलजींच्या स्मृतीना उजाळा देणाऱ्या य कार्यक्रमास पुणेकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन महापौर टिळक यांनी केले आहे.