पिंपरी – क्राईम पेट्रोल मालिका बघून लाखो रुपये लुटण्याचा बनाव दोन जणांनी रचला. पण पोलिसांनी केलेल्या प्रश्नांच्या सरबतींपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. अवघ्या बारा तासांत पोलिसांनी त्यांच्या बनावाची पोलखोल केली आणि लुटलेल्या रोकडसह 34 लाख 39 हजार रुपयांचा ऐवज पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी हस्तगत केला.