रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीचा 78 दिवस पगार बोनस

नवी दिल्ली : रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवस पगाराचा उत्पादकता बोनस देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

सरकारच्या या निर्णयामुळे 11 लाख कर्माचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. उत्पादकतेच्या पार्श्‍वभूमीवर मिळणारा हा सहावा बोनस आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर दोन हजार कोटी रुपयांचा ताण अपेक्षित आहे. केंद्र सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे, असे श्री. जावडेकर यावेळी म्हणाले.

मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णयाची माहिती श्री. जावडेकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. या बैठकीत इ सिगारेटवर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here