VidhanSabhaElection: काँग्रेस जाहीर करणार ५० उमदेवारांची यादी

मुंबई: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतीच ५ विधानसभा मतदार संघातील उमेदवारांची यादी जाहीर केली. दरम्यान, काँग्रेसने देखील ५० उमदेवारांची यादी जाहीर करण्याची घोषणा केली आहे. २० सप्टेंबर रोजी काँग्रेस पाहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.


काँग्रेस-राष्ट्रवादीने ५०-५०चा फार्मुला स्वीकारत १२५-१२५ जागांवर निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. तसेच मित्रपक्षांसाठी ३८ जागा सोडण्यात आल्या आहेत. अशी माहिती शरद पवार आणि अशोक चव्हाण यांनी यापूर्वी दिली आहे.

VidhanSabha Election 2019: शरद पवारांकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here