बेल्ह्यात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा उत्साहात

जुन्नर तालुक्‍यातून 380 विद्यार्थ्यांचा सहभाग

अणे- पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय – पुणे आणि जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या संयुक्‍त विद्यमाने जुन्नर तालुका शालेय कुस्ती स्पर्धांचे आयोजन बेल्हे (ता. जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल ऍण्ड ज्युनियर कॉलेज येथे करण्यात आले होते.

जुन्नर तालुक्‍यातून एकूण 380 विद्यार्थी या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यातून मुला- मुलींच्या विविध वजनी गटातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची पुणे जिल्हा स्तरावर कुस्तीसाठी निवड करण्यात आली. अनेक कुस्त्या चुरशीच्या झाल्या. या कुस्त्या मॅटवर खेळल्या गेल्या. सर्व पैलवान विद्यार्थ्यांनी आपले कसब लावून कुस्त्या जिंकल्या. मुलांप्रमाणे मुलींच्याही कुस्त्या चुरशीच्या झाल्या. सामन्यात पंच म्हणून दत्ता गावडे व सुरेश काकडे या शिक्षकांना काम पाहिले.

यावेळी जुन्नर तालुका क्रीडा अध्यक्ष गणेश राऊत, कार्याध्यक्ष जालिंदर ढमाले, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ उपसचिव विलास कदम, जुन्नर तालुका कुस्ती संघाचे अध्यक्ष जगन कोऱ्हाळे, बेल्ह्याचे सरपंच राजाभाऊ गुंजाळ, माळशेज निकेतनचे संस्थापक अध्यक्ष सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, संचालक भास्कर पवार, सीईओ शैलेश ढवळे, विश्‍वस्त दावला कणसे, प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य के. पी. सिंग, तालुक्‍यातील विविध शाळांमध्ये क्रीडा शिक्षक, विद्यार्थी, क्रीडाप्रेमी, पैलवान उपस्थित होते.

  • 49 विद्यार्थ्यांची जिल्हा कुस्तीसाठी निवड
    मुलांमध्ये 14 वर्ष वयोगटातील विविध वजनी गटातील 10 मुलांची, 17 वर्षे वयोगटातील 10 मुलांचे, तर फ्री-स्टाईल कुस्तीमध्ये 19 वर्षाखालील 6 मुलांचे आणि 17 वर्षे वयोगटातील 8 मुलांची जिल्हास्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ग्रीकरोमन 17 वर्ष वयोगट 10 मुले आणि ग्रीकरोमन 19 वर्ष वयोगट 5 मुले असे एकूण 49 मुलांची जिल्हा स्तरावर कुस्तीसाठी निवड झाली.
  • 26 मुलींची कुस्तीसाठी निवड
    14 वर्षे वयोगटातील फ्री-स्टाईल कुस्ती मध्ये 10 मुलींची, 17 वर्षे वयोगटातील फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये 10 मुलींची तर 19 वर्षाखालील फ्री-स्टाईल कुस्तीमध्ये 6 मुलींची निवड झाली आहे. अशा एकूण 26 मुलींची जिल्हास्तरावर कुस्तीसाठी निवड झाली.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×