महापुरामुळे हजारो घरे उद्ध्वस्त, त्यांचं पुनर्वसन हा गंभीर विषय – अरविंद सावंत

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात आलेला महापूर म्हणजे राष्ट्रीय आपत्तीच आहे, अस मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत व्यक्त केलंय. ते कोल्हापुरात बोलत होते. दरम्यान महापुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या हजारो घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भाग आणि पुरग्रस्तांना दिली जाणारी मदत या ठिकाणाची पाहणी केली. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या वतीने महासैनिक दरबार हॉल इथं उभारलेल्या पूरग्रस्त नागरिकांच्या मदत केंद्राला त्यांनी भेट दिली. तसंच त्या ठिकाणी असणाऱ्या वस्तूंची पाहणी करून केली.

यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांचं पुनर्वसन हा गंभीर विषय असून या घरांच्या उभारणीला किती निधी लागेल याचा डाटा तयार करणे गरजेचे आहे. शासन, एनजीओ आणि केंद्र सरकार या सर्वांनी मिळून मदत करणे गरजेचे आहे. त्यांची घरं उभारणं मोठं काम आहे असून कोल्हापुरात आलेला महापूर म्हणजे खरंच राष्ट्रीय आपत्ती आहे.

मी सरकारमध्ये असलो तरी यासंदर्भात निश्चितपणे पाऊल उचललं गरजेचं असल्याचं केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.