बांधकाम कामगारांची नोंदणी करा – राजेंद्र कोरे

जुन्नर-शासनाच्या कामगार बांधकाम कल्याणकारी योजनेमध्ये कामगारांची नोंदणी करून विविध फायदे मिळवून द्यावेत, असे आवाहन प्रसिद्ध वास्तुविशारद राजेंद्र कोरे यांनी केले. इंजिनिअर्स बिल्डर्स अँड कॉन्ट्रॅक्‍टर्स असोसिएशनच्या पदग्रहण प्रसंगी बारव (ता. जुन्नर) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीत मुकेश ताजणे यांची अध्यक्षपदी तर जितेंद्र काळे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

बांधकाम व्यावसायिकांसाठी रेरा संदर्भातील विविध प्रश्नांवर व्याख्यानमाला, संघटनेसाठी स्वतंत्र कार्यालय, नगरपालिकेतील विविध प्रश्न आदी विषय अग्रक्रमाने सोडविण्याचा मानस असल्याचे नूतन अध्यक्ष मुकेश ताजणे यांनी याप्रसंगी सांगितले. याप्रसंगी शिवांजली परिवाराचे संस्थापक शिवाजी चाळक, तुषार कुलकर्णी, अनिल जाधव, विनय वाबळे, विनायक कर्पे, संजय गांधी, तुषार लाहोरकर, बंडू कर्पे, मिलिंद झगडे, आदित्य पुरवंत, संतोष नवले, नितीन माळवदकर, प्रदीप थोरवे, असोसिएशनचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)