पुणे – राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आज प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठींनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानले.
तसेच ‘पक्षाने दाखवलेला विश्वास हा सामान्य कार्यकर्त्याचा बहुमान आहे, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना पक्षात नेहमी न्याय मिळतो’, असेही त्या म्हणाल्या.
आज प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. @JadhavRakhee @MumbaiNCP pic.twitter.com/SfH9ySndOE
— NCP (@NCPspeaks) July 29, 2019
दरम्यान, शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पक्ष आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पदावर राष्ट्रवादीने तातडीने पुण्यातील रूपाली चाकणकर यांची नियुक्ती केली होती.