प्रणव, प्रज्वल, संदेश, सोनल मुख्य फेरीत दाखल

पाचगणी – रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज रवाईन हॉटेल नॅशनल सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात प्रणव गाडगीळ, प्रज्वल तिवारी, संदेश कुरळे यांनी, तर मुलींच्या गटात रुमा गाईकैवारी, संजीवनी कुतवळ, सोनल पाटील, जिया परेरा या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत 16 वर्षाखालील मुलांच्या गटात प्रणव गाडगीळने आर्यन हूडचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 6-4 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. प्रज्वल तिवारीने चैतन्य आलूमवर टायब्रेकमध्ये 7-6(4), 6-3 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. यशराज दळवीने शर्विल पाटीलचा 6-0, 6-0 असा सहज पराभव केला. संदेश कुरळे याने अनुप बंगार्गीला 6-2, 6-4 असे पराभूत केले.
मुलींच्या गटात रुमा गाईकैवारी हिने हरश्री आशेरचा 6-1, 6-0 असा तर, सोनल पाटीलने गार्गी शहाचा 6-0, 6-0 असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.

सविस्तर निकाल : 16 वर्षाखालील मुले :

यशराज दळवी (महाराष्ट्र) वि.वि. शर्विल पाटील (महाराष्ट्र)6-0, 6-0, संदेश कुरळे (महाराष्ट्र) वि.वि. अनुप बंगार्गी 6-2, 6-4, अर्जुन प्रेमकुमार(कर्नाटक)वि.वि.ओम काकड(महाराष्ट्र) 6-2, 6-1, आयुश हिंदलेकर(महाराष्ट्र)वि.वि.आर्यन कोटस्थाने(महाराष्ट्र) 6-4, 6-4, शंतनु नांबीयार(महाराष्ट्र)वि.वि.ईशान जिगली(महाराष्ट्र) 6-3, 6-2, प्रणव गाडगीळ(महाराष्ट्र)वि.वि.आर्यन हूड(महाराष्ट्र) 7-6(4), 6-4, प्रज्वल तिवारी(महाराष्ट्र)वि.वि.चैतन्य आलूम 7-6(4), 6-3, काफिल कडवेकर(महाराष्ट्र)वि.वि.प्रसाद इंगळे(महाराष्ट्र) 2-6, 6-2, 7-5.

16 वर्षाखालील मुली –

लक्ष्मी अरुणकुमार वि.वि.कुंडली मजगैने(महाराष्ट्र) 1-6, 6-3, 6-4, हर्षिता बांगेरा वि.वि.मिली चुग(महाराष्ट्र) 6-2, 6-2, वैष्णवी वाकिती(तेलंगणा)वि.वि.वृशिष्टा कुमार(महाराष्ट्र) 6-2, 6-3, रुमा गाईकैवारी(महाराष्ट्र)वि.वि.हरश्री आशेर(महाराष्ट्र) 6-1, 6-0,
नागा रोशनी अरुणकुमार(तामिळनाडू)वि.वि.श्रावणी खवळे(महाराष्ट्र)7-5, 7-5, संजीवनी कुतवळ(महाराष्ट्र)वि.वि.साज तंडेल(महाराष्ट्र) 6-2, 6-2, सोनल पाटील(महाराष्ट्र)वि.वि.गार्गी शहा(महाराष्ट्र) 6-0, 6-0, जिया परेरा(महाराष्ट्र)वि.वि.कनिष्का मल्लेला(कर्नाटक) 6-4, 6-0.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.