कोल्हापूर अर्बन बँकेला 67 लाखांचा ऑनलाईन गंडा

कोल्हापूर – दी कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे एचडीएफसी बँकेच्या खात्यातून ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. यामध्ये हॅकर्सनी तब्बलव 67 लाख रुपये लंपास केले आहेत. या ऑनलाइन दरोड्याने बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

ही घटना शुक्रवारी सकाळी 11.05 ते दुपारी 2.28 या काळात घडली. आरटीजीएस व एनईएफटी ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करून, संशयिताने अर्बन बँकेला गंडा घालून फसवणूक केली. ही रक्कम चोरट्याने परस्पर 34 खात्यांवर हस्तांतर केली आहे. याप्रकरणी ‘दी कोल्हापूर अर्बन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बाजीराव खरोशी यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. कोल्हापूर पोलीस मुंबई सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.