पुणे – ज्योतीकुमारी प्रकरणातील दोघांना फाशी

पुणे – बीपीओतील कर्मचारी ज्योतीकुमारी चौधरी प्रकरणातील दोन आरोपींना 24 जून रोजी फाशी देण्यात येणार आहे. पुणे शहरामध्ये 2007 मध्ये ज्योती कुमारी चौधरी हिचा बलात्कार करून खून करण्यात आला होता. याबाबत पुणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांनी 10 एप्रिल रोजी वॉरंट जारी केले आहे.

पुरूषोत्तम बोराटे (36), प्रदीप काकडे (31) अशी फाशी देण्यात येणाऱ्या दोघांची नावे आहेत. 2 नोव्हेंबर 2007 रोजी ही घटना घडली होती. सध्या दोघे येरवडा कारागृहात आहेत. ज्योती कुमारी ही मूळची गोरखपूर येथील होती. नोकरीच्या अखेरच्या दिवशी बोराडे आणि काकडे यांनी तिला तिच्या घरातून कार्यालयात नेण्यासाठी कंपनीच्या गाडीमध्ये बसवले. मात्र, दुसऱ्या दिवशी ती घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान, 2 नोव्हेंबर 2007 रोजी गहुंजे येथे तिचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी बोराटे आणि काकडे यांना अटक करण्यात आली होती. मार्च 2012 मध्ये पुणे सत्र न्यायालयाने दोघांना दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्ष सुनावली. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने हीच शिक्षा कायम ठेवली.

राज्यपाल विद्यासागर राव यांनी या दोघांचा दयेचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर राष्ट्रपतींनी दोन वर्षांपूर्वी या दोघांचा दयेचा अर्ज फेटाळला होता. दरम्यान, पुणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी दोघांना फाशी देण्याबाबत वॉरंट जारी केले असून, याबाबत येरवडा मुख्य अधिकाऱ्याला फाशीची अंमलबजावणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार 24 जून रोजी दोघांना फाशी देण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.