पुणे – विमानसेवेला प्रवाशांचाच ‘बाय-बाय’

संख्या घटली : डायरेक्‍टोरेट जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन


गेल्या चार वर्षांत यंदाच्या मार्चमध्ये मोठा फटका

पुणे – लोहगाव विमानतळाहून प्रवास करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली होती. मात्र गेल्या सुमारे चार वर्षांमध्ये पहिल्यांदाच मार्च महिन्यात पुण्याहून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली असल्याचे अहवालातून समोर आले.

डायरेक्‍टोरेट जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशनने (डीजीसीए) जाहीर केलेल्या अहवालाद्वारे प्रवासी संख्या घटल्याची बाब समोर आली. यामध्ये लोहगाव विमानतळावरील उड्डाणांची संख्या कमी झाल्याबरोबरच प्रवाशांची संख्या कमी झाल्याचे समोर आले. प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याने उड्डाणांशिवाय अजून काही कारणे आहेत का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अहवालानुसार, 2016-17 मध्ये प्रवासी संख्या सुमारे 54 लाख 34 हजार होती. तर 2017-18 मध्ये ती सुमारे 81 लाखांवर पोहोचली. तर गेल्या काही वर्षांतील अहवालानुसार साधारणपणे दरवर्षी सरासरी 20 ते 25 टक्‍यांनी वाढ होते. मात्र, यंदा मार्च महिन्यापासून उड्डाणांची संख्या कमी झाल्याने प्रवासी संख्या घटली आहे. याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर होऊन सरासरी प्रवासी संख्या घटण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.