पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोहगाव विमानतळावरील नवीन टर्मिनलचे उद्घाटन होवून आता एक महिना होत आला, तरी अद्याप टर्मिनल प्रवाशांसाठी खुले करण्यात आले नाही. त्यामुळे एन उन्हाळी हंगामात जुन्या टर्मिनलवर प्रवाशांची वाढत्या गर्दीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. तेच नवीन टर्मिनल खुले झाले तर प्रवाशांना दिलासा मिळेल.
पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 मार्च रोजी झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टर्मिनलचे उद्घाटन झाले असले तरी प्रत्यक्षात टर्मिनल सुरू होण्यास वेळ लागणार आहे.
त्यामुळे १ एप्रिल पासून हे टर्मिनल सुरू करण्याच्या सूचना विमानतळ प्राधिकरणाला पवार यांनी दिल्या होत्या. मात्र, विमानतळ प्रशासनाने एप्रिल फुल्ल केले असून, अजून दोन आठवडे टर्मिनल सुरू होण्यासाठी लागतील, असे प्रशासनाकडून सांगितले जात असून, 15 एप्रिलपर्यंत तरी हे टर्मिनल सुरू होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.