दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चारचाकीवाल्यांची धडक

नगर कल्याण महामार्गावर चार वाहनाचा विचित्र अपघात : टाकळी ढोकेश्‍वर येथील घटना

पारनेर – नगर कल्याण महामार्गावर असणाऱ्या टाकळी ढोकेश्‍वर येथील गायकवाड वस्ती वळणाजवळ क्रेनला दुचाकीस्वार आडवा आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली आहे.
मंगळवारी सकाळी 9.30 वा हि घटना झाली असून या अपघातात तीनही वाहनातील पाच जण जखमी झाले आहेत. या जखमींपैकी काहींना अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात तर काहींना टाकळी ढोकेश्‍वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकीकडे निवडणुकीची घाई गर्दी चालू असताना दुसरीकडे टाकळीचे सहाय्यक फौजदार रोहिदास शेलार यांनी जखमींना उपचारासाठी दवाखान्यत हलविण्यास मदत केली.

मंगळवारी सकाळी 9 च्या दरम्यान आळेफाट्याकडून क्रेनला पिकअप टोचण करून न्हेत असताना टाकळी ढोकेश्‍वर येथील गायकवाड वस्ती जवळील वळणावर चारा छावणी वरून अशोक गोपाळा गोरडे (वय 32), रा. गोरडे वस्ती, टाकळी ढोकेश्‍वर(ता.पारनेर) व वडील गोपाळा गोरडे दुचाकीवर ऊसाची कुटी करण्यासाठी घरी जात असताना दुचाकीस्वराला वाचवणाच्या प्रयत्नात क्रेनने स्विप्ट कारला जोराची धडक दिली. त्यामुळे या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहे.

या संबधी अधिक समजलेली माहिती कि, अशोक गोरडे व वडील गोपाळा गोरडे हे बाजारसमितीच्या वतीने टाकळी ढोकेश्‍वर (ता.पारनेर) येथील गायकवाड वस्तीवरील जनावरांच्या छावणीवर मुक्कामी होते. छावणीवरील वीज खंडित झाल्यामुळे जनावरांसाठी ऊसाची कुट्टी करण्यासाठी आपल्या दुचाकीवरून (एम.एच 16 बीएन-8202) घेऊन चालले होते. त्याच दरम्यान नगर कल्याण महामार्गावर आळेफाट्याकडून क्रेन पीकपला टोचण करून घेऊन येत असताना या दुचाकीची धडक झाली क्रेनच्या चालकाने दुचाकीस्वाराला वाचवणाच्या प्रयत्नात समोरून अहमदनगर कडून कल्याण कडे जात असलेल्या अमेझी कारला (एम.एच 20 ईवाय 2148) जोराची धडक दिली. या तीन वाहनांच्या अपघातात पाच जखमी झाले असून त्यात दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत.

या अपघातात अमेझी कार मधील अरुण विठ्ठल वानखडे वय 26 व रोशन शिंदे रा.शिवाजी नगर ,औरंगाबाद हे दोघेजण मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला आहे. हा क्रेन या पीकअपला एम.एच 16 बीएच 0691 घेऊन अहमदनगर कडे घेऊन चालला होता. या क्रेनचा चालक गणेश सुभाष औटी रा.राजुरी(ता.जुन्नर) हा गंभीर जखमी झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.