नवी दिल्ली – न्यायालयातील एका माजी कर्मचारी महिलेने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. याप्रकरणी आज तीन सदस्यसीय पीठाने सुनावणी केली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावरील लैंगिक शोषणाचे आरोप हे मोठ्या कारस्थानाचा भाग आहे. पैशाच्या आधारावर लोक कोणाचीही प्रतिमा मलिन करू शकत नाहीत. हे सर्व थांबविले पाहिजे, असे न्या. अरुण मिश्रा यांनी म्हंटले आहे.
न्या. अरुण मिश्रा म्हणाले की, रंजन गोगोई यांच्यावरील लैंगिक शोषणाचे आरोप हे मोठ्या कारस्थानाचा भाग आहेत. अशा कारस्थानाद्वारे न्यायपालिकेला बदनाम करणे सुरूच राहिले तर न्यायपालिकाही अस्तित्वात राहणार नाही आणि न्यायाधीशही टिकून राहणार नाहीत. लोक पैशाच्या आधारावर सर्व प्रकरणे सेटल करू पाहत आहेत. तुम्ही कोणाचीही प्रतिमा मलीन करू शकता. न्यायाधीश येतात आणि जातात. ही संस्था तुमची आहे. तुम्हाला संस्थेला स्वच्छ ठेवले पाहिजे. मूठभर श्रीमंत विचार करतात की ते न्यायालय चालवत आहेत. परंतु, आता वेळ आहे देशातील ताकदवान आणि श्रीमंत लोकांना सांगायची की ते असे करू शकत नाही. ते न्यायिक प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकत नाही.