पुणे – तिकीट रकमेचे टार्गेट पूर्ण न करणे भोवले

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाचे एप्रिल आणि मे महिन्यातील उत्पन्नाचे “टार्गेट’ पूर्ण न केल्याने 18 वाहकांच्या बदल्या करण्याचे आदेश पीएमपी प्रशासनाने दिले आहेत.

शहराची सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या पीएमपीची सध्याची आर्थिक अवस्था बिकट आहे. त्यामुळे प्रशासनाकडून उत्पन्न वाढीसाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रशासनाबरोबरच वाहकांना देखील हजारोंच्या घरात उत्पन्न वाढीचे टार्गेट देण्यात आले आहे. वाहकांकडून टार्गेट पूर्ण न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा यापूर्वीच पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आला होता. त्यानुसार प्रशासनाने एकूण 18 वाहकांची बदली केली.

यामध्ये निगडी डेपो (2), हडपसर डेपो (2), भोसरी डेपो (2), भेकराईनगर डेपो (3), शेवाळवाडी डेपो (1), पुणे स्टेशन डेपो (2), पिंपरी डेपो (1), बालेवाडी डेपो (2), न.ता.वाडी डेपो (1), मार्केटयार्ड डेपो (1), स्वारगेट डेपो (1) या डेपोंतून वाहकांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तर भोसरी डेपो (2), भेकराईनगर डेपो (3), मार्केटयार्ड डेपो (1), निगडी डेपो (4), बालेवाडी डेपो (1), शेवाळवाडी डेपो (1), हडपसर डेपो (2), स्वारगेट डेपो (1), पुणे स्टेशन डेपो (2), न.ता.वाडी डेपो (1) या डेपोंमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.