…तर निश्‍चित करोनाला अटकाव बसेल : संग्राम जगताप

नगर -करोनाकाळात प्रतिकार शक्ती राखून आरोग्य संपन्न राहणे अत्यावश्‍यक बनले आहे. व्यापार उद्योग करताना व्यावसायिकांनी स्वतःच्या काळजीबरोबर ग्राहकाचीही काळजी घेतली तर करोनाला निश्‍चितच अटकाव बसू शकतो. नगरची बाजारपेठ हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कठीण काळात सर्वच व्यावसायिक नियमांचे पालन करून, ग्राहकांना सेवा देत आहेत. व्यावसायिक, व्यापारी, दुकानदारांच्या प्रयत्नांना ग्राहकांनीही साथ द्यावी, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

शहाजी रोडवरील सो ऍण्ड सो किडस वेअर च्यावतीने करोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्राहकांना रोग प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या व्हिटॅमिन सीच्या गोळ्या देण्यास देण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमाची सुरुवात आ.जगताप यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सो ऍण्ड सो किडस वेअरचे संचालक केतन मुथा, कुंतीलाल मुथा, वंदे मातरम युवा प्रतिष्ठानचे ईश्वर बोरा, प्रतिक बोगावत, अमोल देडगांवकर, रवी किथानी, संदीप बायड, विजय आहेर, तेजस डहाळे, मयुर पितळे, संभव काठेड, कुणाल नारंग, यश मिरांडे, श्‍याम भुतकर आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.