घरभाडे मागितल्याने मारहाण

नगर: घरभाड्याचे पैसे मागीतल्याचा राग येवून घरमालकास लोखंडी रॉड व फाईटने जबर माराहण केली आहे. ही घटना पंचपीर चावडी परिसरातील वैभवी लॉजसमोर शनिवारी घडली. या घटनेत निसार शेख हे जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर असे की, इसहाक शेख रा.न्यू टिळक रोड यांनी त्यांचे पंचपीर चावडी परिसरातील घर युसूफ निसार शेख यास भाड्याने दिले आहे. त्यामुळे इसहाक शेख हे शनिवारी भाडे घेण्यासाठी गेले असता. युसूफ शेख याला भाडे मागितल्याचा राग आल्याने त्याने त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्‍यांनी मारहाण केली.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.