विश्‍वचषक स्पर्धेतील आता पर्यंतचे महत्वाचे 10 विक्रम

1) विश्‍वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्थ्यू हेडन व ऍडम गिलख्रिस्ट यांनी तब्बल 12 वेळा अर्धशतकापेक्षा अधिक धावांच्या भागीदाऱ्या नोंदवल्या असुन कोणत्याही संघाच्या सलामीवीरांनी विश्‍वचषकात या सर्वाधिक अर्धशतकी भागीदाऱ्या आहेत.

2) आतापर्यंतच्या विश्‍वचषक स्पर्धांमध्ये निकाली न निघालेले म्हणजे एकतर अनिर्णित राहिलेले किंवा बरोबरीत (टाय) सुटलेले सामन्यांची संख्या ही 11 असुन या सामन्यांपैकी चार सामने “टाय’ झालेले आहेत.

3) 1992 नंतर प्रथमच यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेमध्ये 10 संघ सहभागी झालेले आहेत.

4) सचिन तेंडूलकरने विश्‍वचषक स्पर्धेत एकुण 9 वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला असुन या स्पर्धेत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम त्याच्यच नावावर आहे. तर, सचिन हा विश्‍वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करनारा खेळाडू असुन सचिनने विश्‍वचषकात 2278 धावा केलेल्या आहेत.

5) बिशनसिंग बेदी यांनी एकाच सामन्यात आठ षटके निर्धाव टाकलेली असुन एका सामन्यात सर्वाधिक निर्धाव षटकांचा 1975 मधील हा विक्रम अजुनही कायम आहे.

6) 2003 च्या विश्‍वचषक स्पर्धेत सचिन तेंडुलकरने तब्बल सात वेळा अर्धशतकांवरील खेळी साकारल्या होत्या. एका विश्‍वचषक स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकी खेळींचा विक्रम अद्यापही त्याच्याच नावावर आहे.

7) भारताने आतापर्यंत विश्‍वचषकात पाकिस्तानवर सहा वेळा विजय मिळवला असुन 1992 पासूनची यशाची मालिका अजुनही कायम आहे.

8) ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत तब्बल पाच वेळा विश्‍वचषक पटकावला असुन यात त्यांनी 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये त्यांनी विजेतेपद पटकावले असुन विश्वविजेतेपदाची हॅट्ट्रीक करणारा ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे.

9) कुमार संघकाराने 2015 सालच्या विश्‍वचषकात लागोपाठ चार शतक ठोकण्याचा पराक्रम केला असुन हा जागतीक विक्रम आता पर्यंत कोणिही मोडू शकलेले नाही.

10) भारताने आतापर्यंत तीन वेळा विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असुन त्यापैकी 1983 व 2011 मध्ये विजेतेपद पटकावले. तर, 2003 मध्ये भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)