जगनमोहन रेड्डींनी घेतली आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

नवी दिल्ली – वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी आज आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी डीएमके अध्यक्ष एमके स्टॅलिन देखील विजयवाडा येथे दाखल झाले होते. तसेच तेलंगनाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी देखील या कार्यक्रमास हजेरी लावली होती. शिवाय अन्य प्रमुख पक्षांच्या नेतेमंडळींची देखील उपस्थिती होती.

आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर जगनमोहन रेड्डी हे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. जगनमोहन रेड्डी हे आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर रेड्डी यांचे पुत्र होय. वायएसआर काँग्रेसच्या पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी राज्यपाल नरसिंहन यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर त्यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. तत्पूर्वी विजयवाडा येथील बैठकीत वायएसआर काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांची एकमताने निवड करण्यात आली.

दरम्यान, वायएसआर काँग्रेसने लोकसभेच्या २५ पैकी २२, तर विधानसभेच्या १७५ पैकी १५१ जागा जिंकल्या आहेत. निवडणूकीत चंद्राबाबू नायडू यांना मिळालेल्या धक्क्यानंतर त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.