चेस्टर ली स्ट्रिट – रनरेट आणि इतर गणितांचा अभ्यास करता बाद फेरीत पोहोचण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक असून स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असताना केवळ आपली प्रतिष्ठा जपण्यास वेस्ट इंडिजचा संघ आज प्रयत्नशील असणार आहे.
विश्वचषक स्पर्धेत काही वेळातच चेस्टर ली स्ट्रिट मैदानावर श्रीलंका आणि वेस्टइंडिज याच्यांतील सामन्यास सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा वेस्टइंडिज संघाच्या बाजूने लागला आहे. वेस्टइंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने गोलंदाजीचा निर्णय घेत श्रीलंकेस प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.
#JasonHolder has opted to bowl in Durham 🏏
Sri Lanka have won their last three World Cup fixtures against West Indies. Can the #MenInMaroon get one back today?#SLvWI | #LionsRoar | #MenInMaroon pic.twitter.com/QPeROkuN8k
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) July 1, 2019
श्रीलंका संघ –
दिमुथ करुणारतने, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, एंजेलो मैथ्यूज, लाहिरु थिरिमाने, धनंजया डी सिल्वा, इसुरू उदाना, जेफ़री वैन्डर्से,के रजिता, लसिथ मलिंगा
वेस्ट इंडिज संघ –
क्रिस गेल, सुनील अम्ब्रिस, शाइ होप, निकोलस पुरन, शिमरोन हेट्मेयर, जेसन होल्डर, कार्लोस ब्रेथवेट, फैबियन एलन, शेल्डन कॉटरेल, ओशन थॉमस, शैनन गेब्रिएल