आम्ही माणसात देव पाहतो : आ. स्नेहलता कोल्हे 

कोपरगाव – आम्ही माणसात देव पाहतो. आमच्या वाढदिवसाबरोबरच तत्सम कार्यक्रमही साजरे करताना समाजाला काय उपयोगी पडू शकतो, याचा विचार करतो. व्यक्तीगत सत्कारापेक्षा आम्हा सर्व परिवाराला त्यातच अत्यानंद मिळतो, असे प्रतिपादन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मतदारसंघातील चितळी येथे नीलवसंत मेडिकल फाउंडेशन, संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि मणिशंकर आय हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी आ. कोल्हे बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी गणेशचे माजी संचालक भाऊसाहेब वाघ होते. प्रारंभी सरपंच दीपाली विष्णू वाघ, उपसरपंच विलास वाघ, सर्व सदस्य व चितळी ग्रामस्थांनी उपस्थितांचे स्वागत केले. विक्रम वाघ यांनी प्रास्तविक करून आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. तसेच चितळी-गोंडेगाव, तसेच दिघी रस्त्याचे काम तातडीने हाती घ्यावे व चितळी-वाकडी परिसरातील बंधारे ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरून द्यावेत, अशी मागणी केली. कोल्हे कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज बत्रा यांनी शिबिराची माहिती दि ली. डॉ. रघुनाथ खांडवाल, डॉ. महेंद्र चौधरी, धनंजय भोईर, संजना जानराव यांनी डोळ्यांचे आजार व घ्यावयीा काळजी, याविषयी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, संजय शेळके, ऍड. अशोक वाघ, संपतराव चौधरी, संजयराव लहारे, जॉनडिअर आसवनी प्रकल्पाचे मनोज गायकवाड, प्रशांत साबळे, गणेश वाघ, सुभाष वाघ, रमेश तनपुरे, बाळासाहेब काशिनाथ वाघ, संजय शेळके, भैयासाहेब वाघ, शंकरराव वाघ यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. कोल्हे म्हणाल्या, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विकासकामांना निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करत आहे. कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे हे देखील युवकांचे प्रश्‍न शासनदरबारी मांडत असतात. शंभर कर्णबधीर मुलांच्या जीवनांत आनंद निर्माण करण्यासाठी त्यांना श्रवणयंत्रे दिली. मतदारसंघातील गोरगरीब मुला-मुलींना वाढदिवसाचे औचित्य साधून वह्या वाटप करण्यात येते. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे असल्याचेही त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)