आम्ही काँग्रेस आमदारांना फोडले नाही; ते स्वतःच आमच्याकडे आले – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (पिवळा शर्ट परिधान केलेले) काँग्रेसच्या फुटीर आमदारांसह

पणजी – कर्नाटकात काँग्रेसच्या १३ आमदारांनी राजीनामा सादर करत कर्नाटकातील जेडीस-काँग्रेस आघाडी सरकार अडचणीत आणल्याची घटना ताजी असतानाच काँग्रेसला काल आणखी एक जोरदार धक्का बसला असून गोव्यातील काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते चंद्रकांत कवलेकर यांच्यासह काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये विलीन झाले आहेत.

दरम्यान, काँग्रेस आमदारांच्या विलीनीकरणाबाबत भाष्य करताना आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेस आमदारांच्या विलीनीकरणाबाबतचा निर्णय आज सायंकाळी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेण्यात येईल असं स्पष्ट केले आहे. प्रमोद सावंत यांनी, “आम्ही काँग्रेस आमदारांना फोडले नसून ते स्वतः आमच्याकडे आले आहेत.” असं देखील स्पष्ट केले आहे.

दरम्यान, गोव्यातील भाजप सरकारमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव मांडलेले काँग्रेसचे १० फुटीर आमदार दिल्ली येथील निवास येथे दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षांशी औपचारिक चर्चा झाल्यानंतर या १० आमदारांचा आज सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश निश्चित असल्याचे मानले जात आहे.

Goa CM Pramod Sawant, in Delhi, on ’10 Congress MLAs merged with BJP in Goa’: There will be a meeting with the BJP Working President JP Nadda in the evening. Further decision will be take after that. We did not break their MLAs, their 10 MLAs came to us. pic.twitter.com/XmBrZb5vLd

— ANI (@ANI) July 11, 2019

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)