उत्तरप्रदेश रेल्वे पोलिसांची पत्रकाराला बेदम मारहाण 

लखनऊ – उत्तरप्रदेशच्या शामली जिल्ह्यात एका खासगी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. अमित शर्मा असे पत्रकराचे नाव असून तो मालगाडी रेल्वे ट्रॅकवरून घसरल्याने या वृत्ताचे तपशील मिळविण्यासाठी घटनास्थळी गेला होता. त्याचवेळी जीआरपी पोलीस कर्मचाऱ्यांनी अमितला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. व त्याच्याकडून कॅमेराही हिसकावून घेतला. या सर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पत्रकार अमित शर्मा याने म्हंटले कि, ते सध्या वेषात होते. कॅमेरा खाली पडल्याने तो उचलण्यास मी खाली वाकलो असता मारहाण करण्यास सुरुवात केली. आणि रात्रभर जेलमध्ये ठेवण्यात आले, असे त्यांनी सांगितले. ही घटना समोर येताच उत्तरप्रदेशचे डीजीपी ओपी सिंह यांनी तात्काळ शामली जीआरपी एसएचओ राकेश कुमार आणि कॉन्स्टेबल संजय पवार यांना निलंबित केले आहे.

https://twitter.com/ANINewsUP/status/1138540666487599104

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)