स्मार्टफोन फास्ट चार्ज करण्यासाठी या ट्रिक्‍स वापरा !

अनेक यूजर्सची तक्रार असते की स्मार्टफोन चार्ज होण्यासाठी खूप वेळ लागतो. तस पाहता आजकाल लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट दिलेला असतो. पण तुमच्याकडे जर जुना स्मार्टफोन असेल आणि तो चार्जिंग होण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर आम्ही तुम्हाला काही ट्रिक्‍स सांगणार आहोत जेणेकरून तुमचा स्मार्टफोन लवकर चार्ज होण्यासाठी मदत होईल. पण तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी जर खराब असेल तर या ट्रिक्‍सचा उपयोग होणार नाही. यासाठी बॅटरी बदलणे हाच एकमेव पर्याय.

अनेक यूजर्स पूर्ण रात्र स्मार्टफोन चार्जिंगला लावून ठेवतात. त्यांचं असं म्हणणं असत की, स्मार्टफोन पूर्ण चार्जिंग होण्यासाठी फारच वेळ लागतो. अशा यूजर्सनी स्मार्टफोन चार्जिंग लावण्यापूर्वी या दोन ट्रिक्‍स वापरून पहाव्यात, यामुळे त्यांचा फोन लवकर चार्ज होण्यास नक्कीच मदत होईल. अनेकवेळा स्मार्टफोन रात्रभर चार्जिंग केल्यानं ओवरचार्ज होऊन ब्लास्ट झाल्याची प्रकरणे तुम्ही ऐकली असतील, त्यामुळं फोन रात्रभर चार्जिंग करणं टाळवं.

एअरप्लेन मोड – स्मार्टफोन चार्जिंग करण्यापूर्वी एअरप्लेन मोडवर टाकल्याने स्मार्टफोनमधील मोबाइल नेटवर्क आणि इतर कनेक्‍टिविटी या ऑफ होतात, त्यामुळे बॅटरीचा वापर कमी होऊन बॅटरी लवकर पूर्णतः चार्ज होते. मात्र बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर पुन्हा एअरप्लेन मोड काढण्यास विसरू नका.

एअरप्लेन मोडवर फोन ठेवण्यासाठी तुम्हाला सेटिग्जमध्ये जावे लागेल. त्याठिकाणी वायरलेस आणि मोबाइल नेटवर्कमध्ये एअरप्लेन मोड पर्याय दिसेल, तो इनबेल केल्यास एअरप्लेन मोड ऍक्‍टिव्ह होईल. किंवा सध्याच्या नवीन ऑपरेटिंग सिस्टमच्या फोनमध्ये वरच्या बाजूला नोटीफिकेशन टॅबमध्येच एअरप्लेन मोडचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. तिथूनही तुम्ही एअरप्लेन मोड इनबेल करू शकता.

स्मार्टफोन स्वीच करणे – स्मार्टफोन स्वीच ऑफ करून चार्जिंगला लावणे जास्त फायद्याचे ठरू शकते. स्मार्टफोन स्वीचऑफ केल्याने फोनमधील सर्व कनेक्‍टिविटी ऑफ झाल्याने बॅटरीचा वापर होतच नाही, त्यामुळं स्मार्टफोनची बॅटरी अधिक वेगानं आणि नेहमीपेक्षा कमी वेळात पूर्णपणे चार्ज होते.

– स्वप्निल हजारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)