नाराज खडसेंचा भाजपाला घरचा आहेर; अधिवेशनात सत्ताधाऱ्यांवर बरसले

मुंबई: सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना नेहमी पाहायला मिळतो. मात्र अधिवेशनात विरोधकांपेक्षा सत्ताधारी पक्षाचे आमदार एकनाथ खडसे सत्ताधाऱ्यांवर बरसले. विधानसभेचे कामकाज सुरू होताच प्रश्नोत्तरांच्या तासात खडसेंनी सरकारवर तुफान हल्लाबोल केला.

एकनाथ खडसे यांनी यापूर्वी देखील भाजपविरोधात आपली उघड नाराजी अनेक सभांमध्ये बोलून दाखवली आहे.  सौर पंपांच्या विषयानंतर त्यांनी आता कुपोषणाच्या विषयावर मंत्र्यांना जाब विचारला. तसेच कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती शासनाच्या काळातच गेल्याचा आरोप खडसेंनी केला.

तसेच, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी केली जात होती.  दरम्यान एकनाथ खडसेंनी अजित पवारांच्या हातात हात मिळविला. त्यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी नाथाभाऊंना डावलणाऱ्या सरकारचा निषेध असो अशी घोषणाबाजी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.