अखेर जेट एअरवेजचे क्रॅश लॅंडिंग

प्रकरण कंपनी न्यायाधिकरणापुढे सुनावणीस जाणार

नवी दिल्ली – बराच काळ वाट पाहूनही जेट एअरवेज कंपनीला नवे प्रवर्तक मिळत नसल्यामुळे या कंपनीला कर्ज देणाऱ्या 26 बॅंकांनी राष्ट्रीय कायदा न्यायाधिकरणात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या कंपनीचे पुनरुज्जीवन अवघड झाले आहे.कंपनीवर बॅंकांचे 8 हजार 500 कोटी रुपयांचे कर्ज आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यावर बराच परिणाम होणार असल्याबद्दल वाईट वाटते असे कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांनी सांगितले.

तिकीट एजंट असलेल्या गोयल यांनी 25 वर्षांपूर्वी जेट एअरवेजची स्थापना केली होती. खेळत्या भांडवलाच्या अभावामुळे 17 एप्रिलपासून या कंपनीची विमाने थांबलेली आहेत. त्याचबरोबर या कंपनीच्या शेअरचा भाव कमी होत आहे. कंपनी विविध व्हेंडर्सचे 10 हजार कोटी रुपये देणे आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा मार्चपासून पगार झाला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे 3 हजार कोटी रुपये देणे आहे. आता या कर्जाच्या वसुलीसाठी नादारी आणि दिवाळखोरी यंत्रणेकडे कामकाज सोपविले जाण्याची शक्‍यता आहे.

मंगळवारी कंपनीचा शेअर इतके 40 टक्‍क्‍यांनी कोसळला.कंपनीच्या शेअरचे कामकाज जूनच्या अखेरीस थांबविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.