बॉम्बच्या स्फोटात दोन जण ठार

लष्कारच्या के. के. रेंज सराव क्षेत्रात घटना

नगर  – नगर तालुक्‍यातील खारे कर्जुने जवळील के. के. रेंज येथील लष्कारच्या सरावाचा बॉम्ब फोडून त्यातील शिसे काढत असताना झालेल्या स्फोटात दोघे जागीच ठार झाले. ही दुर्घटना मंगळवारी रात्री घडली. या स्फोटात अक्षय नवनाथ गायकवाड (वय 19) आणि संदीप भाऊ साहेब तिरवडे (वय 32, रा. खारे कर्जुने) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन जणांची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगरच्या खारे कर्जुने गावाजवळ लष्काराचे के.के.रेंज हे सराव क्षेत्र आहे. लष्करी सराव झाल्यानंतर हे दोघेही बॉम्बचे भंगार शोधण्यासाठी मंगळवारी रात्री के.के. रेंजमध्ये गेले होते. त्यावेळी निकामी झालेला समजून बॉम्ब त्यांनी ताब्यात घेतला. हा बॉम्ब फोडून त्यातील शिसे काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्याचवेळी या बॉम्बचा स्फोट झाला. स्फोट एवढा भयानक होता की त्याचा आवाज आजूबाजूला आल्यानंतर तातडीने लष्करातील अधिकारी व परिसरातील नागरिक या ठिकाणी आले. तेव्हा हे दोन जण या ठिकाणी पडलेले अवस्थेत दिसले.

या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी आले. पोलीस निरीक्षक बोरसे यांनी तातडीने या दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचार होण्यापूर्वीच डॉक्‍टरांनी या दोघांना मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)