करचुकवेगिरीचे रॅकेट दिल्ली पोलिसांकडून उघड

नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी आज करचुकवेगिरीचे एक रॅकेट उघड केले आणि 5 जणांना अटक केली. या गॅंगमधील सदस्य दिल्ली आणि परिसरामधील रहिवासी आहेत. अंकुश अग्रवाल (44), सुभाष चंद (42), अजय कुमार (35), हरिष (24) आणि कमाल (21) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हे सर्वजण बनावट “जीएसटी’ परतावे दाखल करत असत आणि लाखो रुपयांचा अपहार करत असत, असे पोलिसांनी सांगितले. या सर्वांना सेंट्रल डिस्ट्रिक्‍टमधील जामा मशिद पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे. त्या सर्वांविरोधात फसवणूकविरोधी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)